इतिहास
- वसईवर पोर्तुगीजांचे अधिराज्य होते; पेशवाईत चिमाजी अप्पांनी तेथील सत्ता संपुष्टात आणली.
- १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात पालघरने महत्त्वाची भूमिका बजावली.
- सातपाटी, नांदगाव, पालघर, मुरबे व शिरगाव येथील पाच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे.
- जव्हार येथील राजे मुकणे यांचे संस्थान, त्यांचा ऐतिहासिक राजवाडा आजही इतिहास सांगतो.