सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ
पालघर, जिथे अरबी समुद्र आणि सह्याद्री एकत्र येतात. जिथे वारली चित्रकला, तारपा नृत्य आणि औद्योगिक क्रांती एकाच मातीत श्वास घेतात. ही भूमी आहे घोलवडच्या रसाळ चिकूची, सातपाटीच्या जगविख्यात राज्यमासाच्या दणदणीत पापलेटची, केळवा / माहिम / बोर्डी समुद्रकिनाऱ्याची, चविष्ट व रुचकर वाडा-कोलम तांदळाची, तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णिक विद्युत केंद्र यांसारख्या आधुनिक उद्योगांची आणि वसई / तारापूर किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाची.
इथे वारली, कातकरी व मल्हार कोळीया आदिवासी बांधवांचे साधे जीवन आणि महानगराची गती दोन्ही एकत्रित नांदतात. सागरी, नागरी व डोंगरी विविधतेने नटलेले, वैभवशाली, सुदृढ, सुरक्षित आणि जोडलेले पालघरचे भविष्य घडवणे, ही आमची बांधिलकी!!!
पालघर जिल्हा हा पूर्वीच्या विशाल ठाणे जिल्ह्याचा भाग होता. दिनांक 1 ऑगस्ट 2014 रोजी प्रशासकीय सोयीसाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील एक महत्त्वाचा 36 वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. हा जिल्हा प्रामुख्याने उत्तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पश्चिम उतारावर पसरलेला आहे.
पालघर जिल्हा हा 4,697.00 चौ. किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे यांच्या अधिनस्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर हे कार्यालय कार्यरत आहे.
पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसई क्र. 1, पालघर उपविभाग क्र. 1, पालघर उपविभाग क्र. 2, डहाणू उपविभाग व तलासरी उपविभाग हे उपविभाग कार्यरत आहेत.
वसई व तारापूर किल्ले, सांस्कृतिक वारसा
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णिक विद्युत केंद्र
वारली, कातकरी व मल्हार कोळी समाज
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे यांच्या अधिनस्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर हे कार्यालय कार्यरत आहे.
- सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वसई क्र. १
- पालघर उपविभाग क्र. १
- पालघर उपविभाग क्र. २
- डहाणू उपविभाग
- तलासरी उपविभाग
आमची बांधिलकी
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्धारित केलेल्या धोरणांनुसार इमारती, पूल व रस्ते यांची दर्जेदार व टिकाऊ बांधकामे करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना सौजन्यपूर्वक, पारदर्शक आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर कटिबद्ध आहे.